Skip to main content

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शासनाकडून या पेपरसाठी 50 टक्के अनुदान योजना

शासनाकडून आता तंत्रज्ञानयुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मल्चिंग पेपरचा वापर करुन शेती करण्यासाठी शासनाकडून या पेपरसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. शेतामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत असतात. शेतात मल्चिंग पेपरचा वापर करुन किडीचा प्रादुर्भाव, अतिउष्ण तापमान, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करता येतो. 

*प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचे फायदे काय?*  
- मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. 
- भाजीपाला, फळझाडांसह आदी पिकांभोवती मल्चिंग पेपरचे आच्छादन केल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकून राहतो. 
- मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते. 
- नैसर्गिक आपत्तीपासून होणारी हाणी या पेपरच्या वापरामुळे टाळता येते. 

*अनुदान योजनेसाठी कोण पात्र?* 
- वैयक्तिक शेतकरी
- शेतकरी समूह
- बचत गट
- सहकारी संस्था
- शेतकरी उत्पादन संस्था

*आवश्यक कागदपत्रे*  : 
- रेशन कार्ड 
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड झेरॉक्स
- जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- इमेल आयडी

*अनुदान टक्केवारी*  : 
- अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण
- अनुसूचित जमातींना 8 टक्के आरक्षण 
- आदिवासी महिलांना 30 टक्के आरक्षण

*शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?*  : 
सर्वसाधारणपणे प्रति हेक्टर जागेमध्ये मल्चिंग पेपरसाठी 32 हजार रुपये खर्च येतो. या योजनेसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 2 हेक्टर जागेत मल्चिंग पेपर वापरासाठी अनुदान दिले जाते. 
डोंगराळ भागामध्ये मल्चिंग पेपर वापरासाठी 37 हजार खर्च समजून त्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. 

*अर्ज कसा करणार?*  
-अर्जदाराला सर्वात आधी Mahadbt च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
-होमपेजवर आल्यानंतर आधारकार्ड किंवा युजरनेम वापरून लॉगीन करावे लागणार आहे.
- त्यानंतर एक नवीन पेज समोर येईल, त्यामुध्ये कृषी विभागासमोरील अर्ज करा या बटणावर क्लिक करावे. 
- त्यापुढे आणखी एक पेज समोर येईल, त्यात फलोत्पादनमधील बाबी निवडा या बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर योजनेचा अर्ज उघडेल, त्यामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरून जतन करा यावर क्लिक करा, त्यानंतर तुमचा अर्ज भरला जाईल.

*अधिक माहितीसाठी 'या' ठिकाणी संपर्क साधा*  : 
अर्जदाराने आपल्या जिल्ह्याच्या कृषी कार्यालयात जाऊन कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, पर्यवेक्षक मंडळ, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

*टीप*  : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी. 

Comments

Popular posts from this blog

भारतीय सेना अग्निवीर भरती 2025 - संपूर्ण माहिती

भारतीय सेना ने अग्निवीर भरती 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत चालू राहील।  पदांची माहिती: अग्निवीर जनरल ड्यूटी (GD) अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल अग्निवीर ट्रेड्समन सैनिक फार्मा सैनिक तांत्रिक नर्सिंग सहाय्यक महिला लष्करी पोलीस शैक्षणिक पात्रता: अग्निवीर जनरल ड्यूटी (GD): किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 33% गुण आवश्यक। अग्निवीर टेक्निकल: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक। अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल: कोणत्याही शाखेत 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण आवश्यक। अग्निवीर ट्रेड्समन: किमान 33% गुणांसह 10वी उत्तीर्ण। वयोमर्यादा: अग्निवीर (GD/टेक्निकल/असिस्टंट/ट्रेड्समॅन): 17.5 ते 21 वर्षे सैनिक टेक्निकल: 17.5 ते 23 वर्षे सैनिक फार्मा: 19 ते 25 वर्षे JCO धार्मिक शिक्षक: 27 ते 34 वर्षे (1 ऑक्टोबर 2025 पर्यंत) JCO कॅटरिं...

रेशन कार्ड eKYC – घरबसल्या कसे करावे? संपूर्ण माहिती

रेशन कार्ड eKYC – घरबसल्या कसे करावे? संपूर्ण माहिती रेशन कार्ड हे भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आता सरकारने रेशन कार्ड eKYC प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही दुकानात किंवा सरकारी कार्यालयात जाऊन पडताळणी करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून करू शकता. या लेखात आपण रेशन कार्ड eKYC म्हणजे काय?, त्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक अॅप्स आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. रेशन कार्ड eKYC म्हणजे काय? eKYC म्हणजे Electronic Know Your Customer म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ग्राहक पडताळणी करणे. आधी ही प्रक्रिया बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा आधार OTP) द्वारे केली जायची. पण आता Aadhaar Face Authentication तंत्रज्ञान वापरून मोबाईलद्वारे घरबसल्या eKYC करणे शक्य आहे. रेशन कार्ड eKYC का आवश्यक आहे? रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे eKYC केली नाही तर तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. eKYC केल्याने ...