Home SarkariYojana शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई फॉर्म भरणे प्रक्रिया चालू, हा भरा फॉर्म 2024 nuksan bharpai pdf: शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई फॉर्म भरणे प्रक्रिया चालू, हा भरा फॉर्म 2024 nuksan bharpai pdf: Author - personAaple Gav Aaplya Yojna August 07, 2024 0 share शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, शेतकऱ्यांच्या पिकाचा नुकसान पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे झाले असेल तर त्यांना नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, तर यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल व कशी प्रक्रिया असणारे याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा.गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्रसह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस अतिवृष्टी पूर यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये शेतकरी आणि संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये जी पूरस्थिती व अतिवृष्टी झालेली आहे व ज्या शेतकऱ्यांचा पिक किंवा घरांचा नुकसान झालेलं असेल तर अशा ठिकाणी पंचनामानुकसान झालेलं असेल तर अशा ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय यांनी केलेले आहेत.तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला पंच जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आपल्याला यासाठी नुकसान भरपाई शासनाच्या वतीने दिले जाणार आहे कोणाला नुकसान भरपाई मिळणार• ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन नदीकडे आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे यासाठी पंचनामा करून आवश्यक आहे.• याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार आहे• एखाद्या कुटुंबाचे पावसामुळे जर नुकसान झाले असेल तर त्यांना देखील नुकसान भरपाईपीक नुकसान भरपाई साठी आवश्यक कागदपत्रे• आधार कार्ड• बँकेचे पासबुक• सातबारा आठ अ• विहित नमुन्यातल अर्ज• नुकसानग्रस्त पिकाचा फोटोअर्ज प्रक्रिया कशी असणार आहे• सर्वप्रथम आपल्याला आपले आधार कार्ड बँकेचे पासबुक विहित नमुन्यातील अर्ज सातबारा व आठ हे सर्व कागदपत्र एकत्र गोळा करून ह्या कागदपत्रांना आपल्या पिकाचे जे नुकसान झालेला आहे त्याचा प्रत्यक्ष ठिकाणचा फोटो काढून या फॉर्म वरती जोडायचा आहे• व ही सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून तलाठी भाऊसाहेब यांच्याकडे सादर करायचे आहेत तलाठी भाऊसाहेब सदर ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणे करून पंचनामा करतील व सर्व अहवाल तालुका व जिल्हा ठिकाणी सादर करतील• त्यानंतर शासनाकडून निधी दिला जाईल अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहेआपल्याला पीक नुकसान भरपाई चा फॉर्म हवा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करून हा फॉर्म आपल्याला सादर करायचा आहे Tags AgricultureSchemesGovernmentSchemesGovtSchemesIndiaGovtYojanaMaharashtraSchemesSarkariPlansSarkariYojana Facebook Twitter Whatsapp Newer Older
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!