खुशखबर ! राज्यातील या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ही मिळणार मोदी आवास योजनेचा लाभ पण कोणाला वाचा संपूर्ण माहित

Aaple Gav Aaplya Yojna
0
 नमस्कार सर्वांना, आता राज्यातील या प्रवर्गातील नागरिकांना देखील मिळणार मोदी आवास योजनेचा लाभ. मिळणार हक्काचे घर तर काय ? शासनाचा नवीन नियम कोणत्या प्रवर्गातील


पाहायला गेलं तर राज्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना अशा अनेक योजना सुरू आहेत.


Modi Awas Yojana
त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. असेच आता काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील

ओबीसी समाजातील नागरिकांसाठी ‘मोदी आवास योजना महाराष्ट्र’ शासनाने सुरू केली आहेत. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहेत.

या अंतर्गत राज्य शासनाने योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत योजना ओबीसी समाजातील नागरिकांसाठी सुरू होती.


परंतु आता इतर मागासप्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गासोबतच, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नागरिकांचे देखील या योजनेत समावेश करण्यात आला आहेत.

आता राज्य शासनाने नुकतीच याला मान्यता देखील दिलेली आहे. शासन निर्णय म्हणजे जीआर देखील याचा निर्गमित केला आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील मृदू व जल संशोधन मंत्री राठोड यांनी

मुख्यमंत्र्याकडे पाठपुरवठा केला होता. त्यावेळी आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि आता विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जाती, जमाती यांचा मोदी आवास योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.


या प्रवर्गातील गरजवंत लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि त्यातच महत्वाचं नवीन जारी झालेल्या शासन निर्णयामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती

प्रवर्गातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा आधीच लाभ घेतलेल्या नसावा. अशी महत्त्वाच्या अट, नियम, घालून देण्यात आलेली आहे.

अशा पद्धतीने आता ही शासनाची योजना आहे, याचा लाभ नक्कीच आता लाभार्थ्यांना मिळणार आहे. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद…

Post a Comment

0Comments

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Post a Comment (0)