Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...

दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी मिळणार मोफत ई- वाहन( रिक्षा ) संपुर्ण माहिती पहा फक्त एका क्लिक वर 👇

दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या हेतूने महाराष्ट्र राज्यस्तरावरील दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून *ई-वाहन (म्हणजेच तीन चाकी टेम्पो) मोफत मिळणार आहे.* *प्रमुख अटी* १. ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती (स्त्री व पुरुष) २. वय वर्षे १८ ते ५५ या दरम्यान असावे. *लागणारी कागदपत्रे* १. अर्जदाराचा फोटो २. अर्जदाराची स्कॅन केलेली सही ३. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल प्रमाणपत्र नसल्यास जवळच्या तहसील कार्यालयातून हे घेऊ शकता, त्यासाठी १५ दिवस लागतात) ४. निवासाचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल इ.) ५. ओळखीचा पुरावा (पॅनकार्ड, मतदान कार्ड इ.) ६. दिव्यांग प्रमाणपत्र (नवीन वाले) ७. UDID दिव्यांग कार्ड ८. अर्जदाराचा बँक पासबुक ९. अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र (फॉर्म भरताना नमुना दिसेल, तो प्रिंट करून भरून अपलोड करावा) १०. अर्जदार आरक्षित प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला जोडावा, अन्यथा अर्जदाराने खुल्या गटातून अर्ज करावा. *अर्ज कसा करावा?* अर्जदाराने https://evehicleform.mshfdc.co.in/login ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा. अर्ज भरण्यास एकदम सोप्पा आहे. मोबाईल...

पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना संपूर्ण माहिती पहा फक्त एका क्लिक वर

 पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना (Dr. Punjabrao Deshmukh Crop Loan Concession Subsidy Scheme)ही 1990 मध्ये महाराष्ट्रातील सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh)यांच्या नावानं सुरु केली. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers)सुरू करण्यात आली. पीक कर्ज सवलत अनुदान योजनेंतर्गत जे शेतकरी पीक घेतात किंवा इतर प्रकारचे कर्ज घेत आहेत, त्यांना व्याज अनुदान (Interest subsidy)मिळवून फायदा दिला जातो. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना राज्यात यापूर्वीच लागू झालेली आहे. या योजनेनुसार त्रिस्तरीय सहकारी पतसंस्थेकडून तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची उचल करुन दिली जाते. मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावर चार टक्के व्याज सवलत दिली जाते. त्यापुढील तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर दोन टक्के व्याज सवलत दिली जाते. तीन लाखांपर्यंत अल्प मुदत कर्जाची नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून व्याज सवलतीचा दर 2011-12 पासून दोन टक्क्यांऐवजी तीन टक्के करण्याचे ठरले आहे. शेतकरी शेतीसाठी घेण...

पोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना संपूर्ण माहिती पहा फक्त एका क्लिक वर

हवामान बदलामुळे (Climate change)उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करुन सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून (Government of Maharashtra)नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project)सुरु केला. गांडूळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ आदिंपासून गांडुळांमार्फत हे बनवले जाते. या खतामध्ये व्हिटॅमिन, संजीवके, विविध जिवाणू तसेच इतर शेतीसाठी(agriculture) आवश्यक जिवाणू असल्याने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. *उद्दिष्ट्ये*  : 1. शेतीचा उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्नात वाढ करणे. 2. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पौष्टिक अन्नधान्याचं उत्पादन घेणे. ३. शेतजमिनीची सुपीकता दीर्घकाळापर्यंत टिकवणे. 4. नैसर्गिक घटकांचा वापर करुन शेती करणे. 5. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करणे. *पात्रता*  : – अर्जदाराकडे दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी 65 टक्के मदत दिली जाते. – प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकर...